*राजे धर्मराव महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न*

0
1283
Google search engine
Google search engine

मुलचेरा :-
स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश मेश्राम हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुनंदा पाल व प्रा. डॉ. हिराचंद वेस्कडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पाल यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याचे मोल अतुलनीय आहेत, अशा भावना व्यक्त केल्या. सावित्रीबाई म्हणजे अखिल भारतीय समाजातील स्त्रियांच्या मुक्तीमाता आहेत आणि त्याच खऱ्या विद्येच्या देवता आहेत, असे डॉ. वेस्कडे म्हणाले. प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी आजच्या युगातील स्त्रियांनी कोणाचा आदर्श ठेवायचा असेल तर सावित्रीबाईंचा ठेवावा, असे मत प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे संचालन कु. सुष्मिता मंडल हिने केले तर उपस्थितांचे आभार कु. शालू वनकर हिने केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रा. अंकुश घरत, डॉ. राजेशकुमार सूर डॉ. हेमंत गजाडीवार, प्रा. अशोक धोटे, डॉ. अरुण लाडे, प्रवीण कुमरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र मत्ते, मनोज कुंभारे, आनंद तावाडे, राजू मडावी, सुरेश मुरमुरवार, मारोती खिरटकर, कविता उईके यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.