भीमा कोरे गाव निषेधार्थ काजळी येथे काही काळ बंद टायर जाळून आणि रस्ता अडवून शांततेत पार पाडला बंद

0
617
Google search engine
Google search engine

बादल डकरे / काजळी देऊरवाडा-

भीमा कोरे येथे अभिवादन करण्यासाठी देशभरातून आलेल्या भीम अनुयायी यांच्यावर हल्ला झाला.त्याचा मुळे आज दिनांक 3 जानेवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक होती.या हाकेला समर्थन म्हणून काजळी येथील युवकांनी या बदल आपला पाठींबा दर्शविला.
विदर्भातील सर्वात मोठी यात्रा बहिरम ला जाण्याकरिता काजळी गावातून योग्य पडत असल्याने युवकांनी माधान रोडवर युवकांनी तळ ठोकला आणि बंद पुकारला त्यामुळे काही काळ बरीच शी वाहने या ठिकाणी थांबली होती.यावेळी नितीन देशमुख,प्रफुल्ल वानखडे,सागर अवसरमोल,प्रफुल अवसरमोल आणि मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते.