*प्रदीर्घ सेवा देवून वरिष्ठ लिपीक डिगांबर पारधी सेवानीवृत्त*

0
617
Google search engine
Google search engine

अचलपूर:- राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अचरपूर येथे कार्यरत वरिष्ठ लिपीक डिगांबर पारधी शासकीय सेवानियमानुसार सेवानीवृती झाले त्यांचे कार्याचा गौरव म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा भावपूर्ण सत्कार करून त्यांना निरोप दिला.
राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अचलपूर येथे गेल्या 33 वर्षापेक्षा अधिक सेवा देत आज वरिष्ठ लिपीक म्हणून डि.एन.पारधी सेवानीवृती झाले.त्यांनी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा सुरू केली तसेच 5 वी ते 8 वी ला गणित व विज्ञान विषय शिकवीला तसेच कनिष्ठ लिपीक म्हणून बढती घेऊन आज आपल्या सेवाकाळाची निर्धारीत अठ्ठावण वर्ष पुर्ण करुन सेवानीवृती झाले.त्यांच्या सोज्वळ व सरळ स्वभावाची सर्वच स्तरात परीचय होता.कामात सदैव सरस असणा-या आपल्या सहकार्याला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निरोप देवून त्यांचा सपत्नीक सत्कार केला यावेळी अवी कडू ,विशवेश्वर ठाकरे,अरूण अग्रवाल,उपमुख्याध्यापक सुनिल झंवर,राधिका बैस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री प्रमोद नैकेले यांनी त्यांच्या कार्याचा तसेच अतिशय साधारण कुटुंबातून परिश्रमपूर्वक यशस्वी सेवा दिल्याचे प्रतिपादन केले.सत्कार समारंभाला त्यांची सहचारीणी पुष्पाताई भाऊ अनिल सपत्नीक व दोन मुलांसह उपस्थित होते.सत्काराला उत्तर देतांना डि.एन.पारधी यांनी सहकार्य व सत्कार केला याबद्दल धन्यवाद मानले कार्यक्रमाचे संचलन शिक्षक प्रतिनिधी महेश शेरेकर तर आभार पर्यवेक्षीका ममता तिवारी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दिली.