डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला

0
1307
Google search engine
Google search engine

पुणे – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी ३ फेब्रुवारीला झाली. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयातील आरोप निश्‍चितीच्या सुनावणीस स्थगिती दिली असल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला ठेवल्याचे सांगितले.

या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्त्या (कु.) नीता धावडे हे उपस्थित होते. या प्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना उपस्थित करण्यात आले होते.