विविध १९ कामांचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न – अनेकांची उपस्थिती

0
1615
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
नगर परीषद, चांदुर रेल्वे अंतर्गत प्रभाग क्र. २, ३, ७ व ८ मधील २ कोटी १० लाख रूपयांच्या विविध १९ कामांचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा सोमवारी थाटात संपन्न झाला.
        मनीष वाल्दे यांच्या घरा जवळील रस्ता काँक्रिटीकरण व नाली बांधकाम, स्थुल यांच्या घरापासून ते शेलोकार व मेश्राम ते वऱ्हाडे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे, प्रशांत डोरलीकर ते धामणगाव रस्ता पर्यंत रस्ता खडीकरण करणे, सरोदे यांचे घर ते गुलमोहर कॉलनी पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, कोते यांचे घर ते मिश्रा यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, मंगलमूर्ती समाज मंदिर बांधकाम करणे, फारूख मेमन यांच्या घरापासून ते जोरावर खॉं व पुढे लाडे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, रमेश मोटवानी यांच्या घरापासून ते नरेश मोटवानी यांचे घरापर्यंत व रोशन मोटवानी यांच्या घरापासून ते काळे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे, पात्रीकर कॉलनी येथे दोन्ही बाजूने नाली बांधकाम करणे, पात्रीकर कॉलनी व गजानन महाराज मंदिर येथील खुल्या जागा विकसित करणे, खरबडे यांच्या घरापासून ते श्री गजानन महाराज मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, टिक्कस पटवारी ते लिटील स्टार शाळेपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, सवाने यांचे घर ते वाढोनकर यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रमोद इंगळे यांचे घर ते राजू चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, पात्रीकर कॉलनीतील मुख्य रस्ता सुधारणा करणे, आठवडी बाजार ते अमरावती रोडपर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे, माणिक गजभिये यांच्या घरापासून ते विठ्ठल हटवार यांचे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, हुतात्मा स्मारक येथे वाढीव बांधकाम करणे, शिवाजीनगर शौचालय बांधकाम या १९ कामांचा भुमिपुजन/लोकार्पण सोहळा आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी होते.
    सदर कार्यक्रमाला उपाध्यक्ष देवानंद खुणे, बांधकाम समिती सभापती सौ. कल्पना राजकुमार लांजेवार, पाणी पुरवठा व जलनिस्सारन समिती सभापती गोटु उर्फ वैभव गायकवाड, स्वच्छता वैद्यक, आरोग्य व शिक्षण समिती सभापती सौ. स्वाती माकोडे , महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. शारदा मेश्राम, महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. शुभांगी वानरे, शबाना हमीद कुरेशी, स्वाती मेटे, प्रणव भेंडे, मुख्याधिकारी रविंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता शैलेंद्र मेटे यांच्यासह परीसरातील शहरवासीयांची प्रामुख्याने उपस्थिती होती.