तहसिलदारांनी तलाठ्याला बजावली शोकाज नोटीस – ठेकेदारालाही दिली नोटीस >< शेततळ्याचे खदानीत रूपांतर केल्याचे प्रकरण

0
573
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे तालुक्यातील लालखेड येथील एका शेतकऱ्याला कृषी विभागाने शेततळ्याची परवानगी दिली. मात्र त्या शेतात सदर शेतकऱ्याला हाताशी घेऊन एका ठेकेदाराने जास्त प्रमाणात मटेरीअल काढुन शेततळ्याचे रूपांतर खदानीत केले. वृत्तपत्रांतुन ही बातमी झळकताच तहसिलदार राजगडकर यांनी संबंधित तलाठ्याला शोकाज नोटीस बजावली आहे. तसेच ठेकेदारालासुध्दा नोटीस देऊन स्पष्टीकरण मागितले असुन या प्रकरणामध्ये दोषी ठेकेदारावर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची शक्यता आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील लालखेड येथील शेत गट नंबर 17/2 मधील क्षेत्र 0.40 हेक्टर आर हे कृषी विभागाने शेततळ्यासाठी मंजूर केलेले होते. तरी कृषी विभागाने याची शहानिशा न करता संबंधित शेततळ्यासाठी उंच वरच्या भागावर तसेच शेत बऱ्याच वर्षांपासून पडीत अवस्थेत असल्यावरही कृषी विभागाने सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित शेतकऱ्याला शेततळ्याची मंजुरी दिली. सदर शेतकऱ्याला हाताशी घेऊन एका ठेकेदाराने याच जागेवर ब्लास्टींग करून चक्क त्या शेततळ्याचे खदानीत रूपांतर केले. दररोज लाखो ब्रास दगड ब्लास्टिंग करून अवैधरित्या वाहतूक करून मालखेड येथील स्टोन क्रशर वरून क्रशिंग होऊन सर्व गिट्टी ही रेल्वेला ठेकेदारामार्फत पुरविल्या जात होती. दिवसाढवळ्या अमरावती रस्त्यालगत असलेल्या या शेततळ्याचे खदानीत अवैधरित्या ब्लास्टींग होत असल्यामुळे जीवितहानी होण्याची सुध्दा दाट शक्यता होती. वृत्तपत्राच्या माध्यमातुन तहसिलदारांना ही बाब माहिती होताच त्यांनी तत्काळ तलाठी यांना शोकाज नोटीस बजावली. तसेच ठेकेदाराला सुध्दा नोटीस देऊन जबाब मागितला आहे. या संपुर्ण चौकशीनंतर संबंधित ठेकेदारावर मोठ्या प्रमाणात दंड ठोकण्याची शक्यता आहे. तहसिलदारांनी या प्रकरणामध्ये मोठा दंड आकारून धाडसी कारवाई करण्याची गरज आहे.