वार्ड क्रमांक 10 मधील रस्ता डांबरीकरण कामास सुरवात, तर समस्या मुक्त वार्ड हाच आमचा निर्धार – शेख सलीम गुलाब समाजिक कार्यकर्ते

0
754
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी – उमेर सय्यद

अहमदनगर – अहमदनगर शहर उपनगरातील मुकुंदनगर गोविंदपुरा प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेविका शेख सलीम जीनत व शेख सलीम (सामजिक कार्यकर्ते ) यांच्या अथक परिश्रमानंतर गोविंदपूरा येथील वार्ड क्रमांक 10 मधील फकीरवाडा ते शाह कॉलनी रस्त्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे !

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असे विशेष करून या रस्त्यावर मंदिर आणि मस्जिद देखील असल्याने सर्व भाविकांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असे मात्र शेख सलीम यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त जाल आहे !

मुकुंदनगर हा भाग तसा विस्ताराने मोठा आहे परंतु या भागात राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक समद खान यांच्या बरोबरीने शेख सलीम यांनी मुकुंदनगर या उपनगराला विकासाच्या द्रुष्टीने सर्वतोपरिने प्रयत्न करून नगरोत्थाण योजने अंतर्गत रस्त्याच्या कामास सुरवात केली आहे !

मुकुंदनगर या उपनगरातील वार्ड क्रमांक 10 मधील महिला राखीव मधून शेख जिनत सलीम ह्या निवडून आल्या त्या नंतर शेख सलीम यानी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक समद खान यांच्या बरोबरीने वार्डात अनेक विकास कामास सुरवात केली आहे ! वार्डात पाणी प्रश्न असो किवा ड्रेनेज लाईन , रस्ते कोन्क्रिटिकरण असो किवा स्ट्रीट लाईट असे अनेक नागरी समस्या शेख सलीम यानी सोडावल्या असून आता रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे !

महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या की सगळे नगरसेवक यांना विकास करावासा वाटतो ! 5 वर्षाच्या कार्यकाळात जे काही करत नाही ते शेवटच्या 1 वर्षात विकास करण्याचा प्रयत्न करत असतात जेणे करून जनतेच्या जीवावर पुन्हा नगरसेवक पदाचा उपभोग घ्यावयाचा असतो परंतु तस न करता अहो रात्र जनतेच्या सेवेत रुजू असणाऱ्या या शेख सलीम यांनी मुकुंदनगर येथील वार्ड क्रमांक 10 ची विकासाच्या द्रुष्टीने वाटचाल करत विकासकामांची सुरवात त्यांनी केली आहे !

तसेच येणाऱ्या काळात देखील अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रत्येक योजनांचा फायदा वार्डातिल नागरिकापर्यंत पोहचवून माझा वार्ड हा समस्या मुक्त वार्ड करण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त करून दाखवला