माणुसकीची गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत

0
853
Google search engine
Google search engine

 

👉🏻मुक्ताई बहुउद्देशीय संस्था चांदुर बाजार यांचा उपक्रम

चांदुर बाजार:-


नुकत्याच मराठी नवीन वर्ष समजला जाणारा गुढी पाडवा हा सण पार पडला.मात्र या सर्व गोष्टी पासून अलिप्त आणि यांची माहिती नसणाऱ्या परिवार सोबत या उत्सव साजरा करण्यात आला.अमरावती येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यलाय आणि चांदुर बाजार येथील मुक्ताई बहुउद्देशीय संस्था यांनी चिखलदरा तालुक्यातील चांदपूर तेथील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य आणि तेथील नागरीक याना वस्त्र यांचे वाटप करण्यात आले.यावेळी त्यांचं चेहऱ्यावर हस्य हे वेगळ्याच प्रकारचे दिसत होते.

आपण समाजात जगत असताना आपले समाजाप्रती काही देणे लागते.मात्र यांची जाणीव ठेवून सतत काही नवनवीन उपक्रम मुक्ताई बहुउद्देशीय संस्था आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय करीत असते.
जागतिक चिमणी दिवस,आत्महत्या ग्रस्त शेतकरी याना आर्थिक मदत शिवकालीन शस्त्र प्रदर्शनी आणि युवकांमध्ये देशभक्ती प्रेरित करण्याचे अनेक उपक्रम या संस्थे मार्फत केली जात असतात.तसेच याच्या या उपक्रम मुळे समाजपुढे एक आगळा वेगळा अशा आदर्श उभा राहिला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून स्वागतच होत आहे.

गुढीपाडवा निमित्त आयोजित या कार्यक्रमाला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यलाय चे धर्मदाय उपयुक्त राहुल मामु,निरीक्षक राऊत,ऍड.मोरस्कार तसेच मुक्ताई बहुउद्देशीय संस्थचे अध्यक्ष विनोद कोरडे,मनोजदादा कटारिया,राजेश लेंडे,रुपेश फूके, शिवाजी काळे,सतीश गुजरकर,अनिकेत बंड, मनीष एकलारे, उदय देशमुक नितीन मोहोड हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कोरडे यांनी यावेळी केले होते.