आज कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर >< पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

0
757
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    अमरावती जिल्हा कॉंग्रेस कमेटी (ग्रामिण) तर्फे कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आज शनिवारी अमरावती येथील रहाटगाव रोडवरील तेलाई मंगल कार्यालय येथे सकाळी ९ वाजतापासुन होणार आहे.
       या शिबीराचे उद्घाटन कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाशजी यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर शिबीराच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण तसेच मार्गदर्शक म्हणुन मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, सौ. चारूलताताई टोकस, आमदार अब्दुल सत्तार आदी उपस्थित राहणार आहे. तरी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आजी – माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालीका, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांनी केले आहे.