संघर्षशील नेते प्रा.टी.पी.मुंडे यांचा आज भव्य नागरी सत्कार

0
742
Google search engine
Google search engine

संघर्षशील नेते प्रा.टी.पी.मुंडे यांचा आज भव्य नागरी सत्कार

बीड: परळी वैजनाथ
नितीन एस ढाकणे

दि.27 महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर सदस्य म्हणून निेवड झाल्याबद्दल आज मंगळवार दि.27 रोजी त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजीत केला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समितीने केले आहे.

नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीच्या 84 व्या महाअधिवेशनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांची निवड करण्याची आली. प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी बीड जिल्हाध्यक्ष,ओ.बी.सी.समिती मराठवाडा प्रभारी, परभणी, लातूर,हिंगोली, औरंगाबाद ग्रामीण आदि जिल्ह्यांचे प्रभारी म्हणूनही यशस्वी कामगीरी केली आहे. गेल्या 35 वर्षापासून ते पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुर, दलीत, अल्पसंख्यांक, व्यापारी,कर्मचारी, विद्यार्थी यांच्या हितासाठी संघर्ष करीत आहेत.कॉंग्रेस पक्षाचे जनकल्याणाची धेय धोरणे तळागाळापर्यंत  पोहचविण्याचे यशस्वी कार्यही ते करीत आहेत.

पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेवूनच कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहूलजी गांधी, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाशजी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी त्यांना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड करून राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

याच निमित्ताने मंगळवार दि.27 रोजी सायं.5.30 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे प्रा.टी.पी. मुंडे (सर) यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समितीने केले आहे.