श्री हनुमान जयंती निमित्ताने तळेगाव येथे भव्य कुस्ती दंगलमध्ये महिला व पुरुष कुस्तीगीरांनी सहभागी व्हावे

0
810
Google search engine
Google search engine

परळी- परळी तालुक्यातील तळेगाव येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जयंती निमित्ताने

बीड: नितीन एस  ढाकणे

जयहिंद युवक व्यायाम शाळा क्रीडा मंडळा तसेच श्री संत भगवानबाबा व्यायाम शाळा मौजे तळेगाव

च्या वतीने शनिवार दि. 31 मार्च रोजी महिला व पुरुष भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आले असून या पार्श्वभुमीवर हनुमान भक्तांनी व कुस्ती खेळांडुंनी परळी ते तळेगाव भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ता.अध्यक्ष मुरलीधर भागवत मुंडे यांनी दिली. जयहिंद युवक व्यायाम शाळा तसेच श्री संत भगवानबाबा व्यायाम शाळेच्या वतीने तळेगाव येथील संत भगवान बाबा व्यायाम शाळेच्या मैदानावर दि.31 मार्च रोजी दु.2 वा. महिला व पुरुष कुस्ती दंगल चे आयोजन करण्यात आले

आहे. श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर खेळाडू व कुस्तीगीरांची एक रॅली आयोजित करण्यात आली आहे. श्री संत भगवानबाबा मंदिर, ईटके कॉनर, शिवाजीनगर येथुन मोटार सायकल रॅली शनिवार,दि.31 मार्च रोजी 12 वाजता रॅलीचा शुभारंभ होणार आहे. ही रॅली शहरातील ईटके कॉर्नर, राणी लक्ष्मीबाई टॉवर, कृष्णा टॉकीज, शिवाजी चौक, बसस्थानक, उड्डानपुल मार्गे टोकवाडीहुन तळेगाव येथे परतीचा प्रवास करणार असून या नंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होईल. या मोटारसायकल रँलीत महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजी केकान यांचा सहभागी होणार आहेत. शहरापासुन जवळच असलेल्या तळेगाव येथे भव्य भगवानबाबा केसरी किताब कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास भगवानबाबा केसरी किताब (गदा) देण्यात येईल. या स्पर्धेत जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील मल्ल मोठ्या प्रमाणात येत असतात. हि कुस्तीस्पर्धा जयहिंद युवक व्यायाम शाळा व क्रिडा मंडळ परळी वैजनाथ व श्री संत भगवानबाबा व्यायाम शाळा तळेगाव यांच्या वतीने चार वर्षापासुन राबविण्यात येत असुन मल्लांच्या जोडीनुसार कुस्ती लावण्यात येवुन विजयी पहेलवानानां योग्य बिदागी देवुन त्यांचा गौरव केला जाण्यांची परंपरा तळेगावाने आजपर्यंत जपली असुन याही वर्षी तीच परंपरा कायम चालु आहे. दरम्यान,कुस्ती स्पर्धेकडे महाराष्ट्रातील मल्लांचे कुस्तीपटूचे लक्ष लागलेले असते. मैदानात होणाऱ्या स्पर्धेत नामवंत मल्लांचा खेळ पाहावयाचि संधी कुस्तीप्रेमींसाठी मिळणार आहे.तरी भव्य कुस्ती दंगलमध्ये महिला व पुरुष कुस्तीगीरांनी सहभागी व्हावे तसेच कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ता.अध्यक्ष मुरलीधर भागवत मुंडे यांनी केले आहे.