संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट

0
759
Google search engine
Google search engine

संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट

प्रतिनिधी
दिपक गित्ते

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली आहे.

भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल करताना मी पाहिले, असे एका महिलेने सांगितले होते. त्यानुसार तक्रार दाखल केली. मात्र चौकशीतून अद्याप एकही पुरावा भिडे गुरुजींविरोधात मिळालेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रकरणाची चौकशी सुरुच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भीमा-कोरेगाव घटनेला कुणीही जबाबदार असले. अगदी ते माझे नातेवाईक असले तरीही त्यांना सोडले जाणार नाही. प्रत्यक्ष संबंध सोडा दुरान्वयेही संबंध आढळला तरी कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.