पू. भिडेगुरुजींच्या समर्थनार्थ आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांत हिंदुत्वनिष्ठांचा ‘पू. भिडेगुरुजी सन्मान महामोर्चा !’

0
737
Google search engine
Google search engine

 

पू. गुरुजींच्या समर्थनार्थ होणार्‍या मोर्च्याला १०० पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा

 

सांगली – राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यासह श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, तसेच गोवा राज्य येथे २८ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठांकडून ‘पू. भिडेगुरुजी सन्मान महामोर्चे’ काढण्यात येणार आहेत. या मोर्च्यात सहस्रोंच्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार असून, त्यात बजरंग दल, हिंदु एकता आंदोलन, विश्‍व हिंदु परिषद, श्रीराम सेना, समस्त हिंदु आघाडी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटना, तसेच भाजप, शिवसेना हे पक्ष यांसह अनेक सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, तसेच अन्य क्षेत्रांत कार्य करणार्‍या संघटनांचा सहभाग असणार आहे. पू. भिडेगुरुजींवर वृथा आरोप करणार्‍या पुरोगामी, डाव्या आणि नास्तिकवादी संघटनांनाया मोर्च्याद्वार सडेतोड उत्तर देण्यात येणार आहे.