शुभ कल्याण’ च्या संचालक मंडळाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
1354
Google search engine
Google search engine

शुभ कल्याण’ च्या संचालक मंडळाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बीड: नितीन ढाकणे

अंबाजोगाई : शुभकल्याण मल्टीस्टेट मधील काही कोटी रुपयांच्या गुंतवणूक
करण्यात आलेल्या रक्कमेचा अपव्यवहार झाल्या प्रकरणी आज अंबाजोगाईच्या
न्यायालयाने शुभकल्याणच्या 5 महिला संचालिकांचा जामिन अर्ज  फेटाळला आहे.
यामुळे शुभकल्याणच्या उर्वरित संचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
औरंगाबाद येथील न्यायालयात त्यांना जामिन मिळाला खरा परंतु, बीड
जिल्ह्यातील अंबाजोगाई न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर
या महिला संचालकांचा जामिन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, आपल्या संघर्षाला
न्याय मिळत असल्याने शुभ कल्याणचे  ठेवीदार समाधानी असून पोलीस व या
प्रकरणात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
शुभ कल्याण मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये मुदत ठेवी व
इतर ठेवींच्या रकमा परत न केल्यामुळे संचालक मंडळावर अंबाजोगाई व परळी
येथे 1 कोटी चा अंबाजोगाई शाखेमध्ये 3 कोटी अपहार केला म्हणून फसवणुकीचा
गुन्हा नोंद कऱण्यात आला आहे. त्यानुसार संचालिका शालीनी आपेट, आशा
बिरादार, प्रतिभा आंधळे, नागीनीबाई शिंदे, कमलबाई नखाते, यांनी मा. विशेष
जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे अटकपूर्व जमीन अर्ज 75 व 76/2018
दाखल केला होता. सदर प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर शुभ कल्याण मल्टी स्टेट
को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या संचालक मंडळाचा अटकपूर्व जामीन अर्ज
फेटाळण्यात आला.शुभ कल्याण मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
च्या 103 शाखेत अपहार होऊन शंभर कोटीची फसवणूक झाली आहे. सदरील प्रकरणात
सरकार पक्षातर्फे ऍड. ए. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहिले व सादर
गुन्ह्याचा तपास एम. एन. शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक,आर्थिक गुन्हे
शाखा बीड हे करत आहेत.
आनंद वाटला परळी शुभकल्याण शाखेत माझ्या सारख्या अनेक निवृत्त कर्मचाऱ्याने मोठ्या
रक्कमेची गुंतवणूक केली आहे. आम्ही आमच्या घामाचा पैसा आणखी पैसे मिळावेत
म्हणून ठेवला परंतु, शुभ कल्याणच्या संचालक मंडळाने आमची फसवणूक केली
आहे. आज न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्याने आम्हाला आनंद वाटत आहे.
आमच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्या चेअरमन दिलीप आपेट विरोधात
पोलीसांकडून कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा आहे. परळीतील ठेवी मोठ्या
असून परळीच्याच माणसाने परळीकरांची लुबाडणूक केली हे मात्र दुदैव.
-शंकर राऊत
मुख्य तक्रारदार, ठेवीदार