शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, मृतदेह पेटवला

0
750
Google search engine
Google search engine

भिवंडी : अहमदनगरमध्ये दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, भिवंडी तालुक्यातही एका शिवसैनिकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. शैलेश निमसे (45 वर्षे) असे या शिवसैनिकाचे नाव आहे.

शैलेश निमसे हे शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख होते. भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला.