*पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था कडेगावकरांची व शेतकऱ्यांची*

0
1158
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव – हेमंत व्यास :-

कडेगांव तलावाचा टेंभु उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश करावा व ज्या शेतकऱ्यांना टेंभु योजनेचे पाणी शेतीसाठी मिलत नाही पण पाणीपट्टी मात्र पाटबंधारे खात्याकडून वसुल केली जात आहे त्या पाणीपट्टीची वसुली बंद करावी ज्या ज्या शेतकऱ्याकडुन पाणीपट्टी वसुल केली आहे त्यांना पाणीपट्टी पावती पाटबंधारे खात्याकडून मिलावी अशा विविध मागण्याचे निवेदन कडेगावच्या तहसिलदार अर्चना शेटे यांना देण्यात आले आहे.

मागण्या मान्य न झाल्यास २३ मे रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा कडेगांवच्या ग्रामस्थाच्या वतिने देण्यात आला आहे.सध्या कडेगांव तलाव कोरडा पडला असल्याने कडेगांवात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.त्यामुले बर्याच शेतकऱ्यांची पीके वालत आहेत.शेतकर्यानी व ग्रामस्थानी टेंभुचे पाणी कडेगांव तलावात सोडण्याची मागणी वारंवार केली असता हा तलाव टेंभु योजनेच्या लाभ क्षेत्रात येत नसल्याचे पाटबंधारे अधिकारी यांचे कडून सांगण्यात येते.टेंभुचे पाणी आटपाडी व सांगोला भागात जाते परंतु कडेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात मात्र सोडले जात नाही.हा तलाव टेंभु योजनेच्या लाभ क्षेत्रात नसल्याचे कारण पुढे करुन पाणी सोडले जात नाही म्हणजे उशाला पाणी व घशाला कोरड अशी अवस्था कडेगाव मधील शेतकरी व ग्रामस्थांची झाली आहे.कडेगाव तलाव टेंभु लाभ क्षेत्रात घ्यावा आणि तात्काल या तलावात पाणी सोडावे व वसुल केलेली टेंभु योजनेची पाणीपट्टी ची पावती पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांना देण्यात यावी व अनियमित शेवाल युक्त व गढुल पाणी पुरवठा होत असल्यामुले लहान मुले व वृध्द यांच्या आजारपणात वाढ होत आहे.त्यामुले शहराला शुध्द पाणी पुरवठा व्हावा अशा विविध मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २३ मे रोजी कडेगांव तहसिल कार्यालया समोर डी.एस.देशमुख,राजाराम संपत माली व शांताराम दिक्षीत यांनी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.