स्व.पोपटरावआण्णा लोणकर उद्यानाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

0
926
Google search engine
Google search engine

 

अनिल चौधरी, पुणे :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे कार्यक्षम नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून कोंढवा खुर्द गावठाणातील शिवगंगा सोसायटी शेजारी पुणे महानगरपालिकेचे अद्यावत असे नागरिकांसाठी स्व.पोपटरावआण्णा लोणकर उद्यानाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे व कै.पोपट लोणकर यांच्या मातोश्री लीलावती लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना साईनाथ बाबर म्हणाले,कोंढवा परिसरात नागरिकांसाठी अद्यायावत असे उद्यान नव्हते , नागरिकांची अडचण समजून घेऊन याठिकाणी अद्ययावत असे उद्यान बनविले आहे. लहान मुलांसाठी खेळणी तसेच सुमधुर संगीत याठिकाणी लावण्यात आले आहे. लॉन तसेच यामध्ये जॉगिंग ट्रॅक देखील बनविण्यात आला आहे.

याप्रसंगी अमित ठाकरे यांनी उद्यानात फेरफटका मारून साईनाथ बाबर यांचे विशेष असे कौतुक केले. यावेळी नगरसेवक वसंत मोरे, मा.नगरसेविका आरती बाबर, प्रतिक लोणकर, शेखर लोणकर, सतीश शिंदे, आबा रोकडे, ह.भ.प.सुदाम वांजळे, ह.भ.प. पंढरीनाथ लोणकर, योगेश बाबर, महेश लोणकर, मनसैनिक तसेच कोंढवा खुर्द ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.