बग्गी (जावरा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

0
938
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      तालुक्यातील बग्गी जावरा येथे धनगर समाज उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची  जयंती नुकतीच साजरी करण्सात आली.
        सदर कार्यक्रम आयोजित करण्याचे पहिलेच वर्ष होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव उघडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पांडुरंग कावळे व प्रमुख पाहुणे सौ. माकोडे, राजेश फटींग, डाॅ. गाढवे, प्रशांत भेंडे उपस्थित होते. पाऊस असतांनाही गावातील बहुसंख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चवाळे यांनी तर आभार प्रदर्शन दादाराव स्वर्गे यानी केले. फलकाचे उद्घाटन लक्ष्मणराव उघडे यांनी केले. त्या नंतर मिरवणूक काढण्यात आली.