क्रांति उद्योग समुहाने कार्यक्षेत्रात वनराई फुलवण्याचा घेतला ध्यास।।

0
918
Google search engine
Google search engine

कडेगांव/हेमंत व्यास :-

पुर्वजनांना पर्यावरण शिक्षणाची गरज नव्हती कारण त्यांना पर्यावरण संतुलन बिघडल्यामुले कोणत्या संकटाना तोंड द्यावे लागेल याची जाणीव होती.त्यामुले ते आपल्या घरा समोर ,शेताच्या बांध्यावर ,विहीरीजवल किंवा रिकाम्या जागेत झाडे लावत असत.या लावलेल्या झाडापासुन जनावरांना व माणसांनाही सावली मिलायची व शुध्द प्राणवायु मिलायचा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर लहान झुडपापासुन ते फले देणाऱ्या वृक्षापैकी आंबा,जांभुल,आवला,चिक्कु ही झाडे आवार्जुन लावली जायची भविष्यात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.हे जुने जाणकार लोक जाणुन होते.भुगर्भात तिव्र जलसंकटाची चाहुल लागली असल्या कारणानेच मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड वत्याचे संवर्धन करावे लागणार हे क्रांती अग्रणी जी.डी.बापुना पक्के ठाऊक होते.त्याच अनुषंगाने क्रांती उद्योग समुहाचे अध्यक्ष अरूण आण्णा लाड यांनी वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्याचे ठरविले.

क्रांति अग्रणी स्व.जि डी बापुसो लाड यांच्या पर्यावरण व निसर्ग संवर्धन चळवळीचा वसा व वारसा अरुण आण्णा लाड यांनी समर्थपणे पेलला आहे त्या काळी बापुंनी दिलेल्या निसर्ग उभारणीचा तसेच संवर्धनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन अरुण आण्णा लाड यांनी आपल्या ७०व्या वाढदिवसा निमीत्त ७०हजार झाडे लावण्याचा व संवर्धनाचा संकल्प हातात घेतला आहे.यामध्ये पहिल्या टप्यात ३९९१४ वृक्ष लागवड पूर्ण झालेली असुन ५६६८ झाडे दत्तक घेतलेली आहेत
व त्या झाडांना दर आठवड्याला पाण्याची उपलब्दताही केली आहे. यावर्षी क्रांति कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना आपल्या साखर कारखान्याच्या वतीने अजुन *७००००हजार झाडांचे आंबा, चिक्कु, नारळ, चिंच, आवळा या झाडांचे मोफत वाटप करण्याची योजना अरुण आण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली क्रांति उद्योग समुहाने केली आहे. एका शेतकर्याला *२५झाडे मोफत देण्यात येणार आहेत.यावेली अरूण आण्णा लाड म्हणाले की,वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे संस्कार जोपासले जायचे असतील तर प्रत्येक शाला,काँलेज,महाविद्यालये,स्वंयसेवी संस्था यांनी वृक्षरक्षाबंधन उपक्रम राबविला पाहीजे.वृक्षलागवड फक्त वन विभागापुरताच नव्हे तर त्याची लोक चलवल करण्यासाठी या सर्व संस्थांनी पुढाकार घेतला पाहीजे.वृक्षलिगवड व संवर्धन ही समाजातील सर्व व्यक्ती आणि समुहासाठी सामाजिक जबाबदारी आहे त्यासाठी शासन,प्रशासना बरोबरच लोकसहभागही अत्यंत महत्वाचा आहे.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व वृक्षलागवड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही अरूण आण्णा लाड यांनी सांगीतले.
या निमीत्ताने देशाचा पोशींदा असणारा शेतकरी आता पर्यावरण संरक्षणाचा रक्षक करण्याचा अरुण आण्णा लाड यांचा मनोदय येणार्या काळात निश्चीतपणे परिपूर्णतेकडे वाटचाल करेल….