विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या चांदूर रेल्वे शहर अध्यक्षपदी ताबिश कुरेशी

0
733
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     विदर्भ राज्य आंदोलन समिती, चांदूर रेल्वे शहर अध्यक्षपदी ताबिश कुरेशी ची निवड करण्यात आली. 
   विदर्भ राज्य समिती गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी प्रयत्नरत आहे. समितीतर्फे अनेक आंदोलने सुध्दा करण्यात आली आहे. यानंतर आता विदर्भ राज्य समितीची चांदूर रेल्वे शहरात सुध्दा कार्यकारीणी तयार करण्यात आली आहे. या समितीच्या चांदूर रेल्वे शहराध्यक्षपदी ताबिश कुरेशी याची निवड नुकतीच समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी केली. यावेळी अमरावती जिल्हा अध्यक्ष नंदू खेरडे, युवा जिल्हा अध्यक्ष अमोल भिसेकर यांची सुध्दा उपस्थिती होती. ताबिश कुरेशी याचे सर्व विदर्भवाद्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. यापुढे वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन चांदूर रेल्वे शहरातून सुध्दा पेटणार आहे.