श्री महालक्ष्मी मंदिरातील पगारी पुजारी नियुक्ती तात्पुरती आणि पर्यायी स्वरूपाची आहे ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

0
832
Google search engine
Google search engine

 

कोल्हापूर – करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या पूजेसाठी सध्या चालू असलेली पुजारी नियुक्ती प्रक्रिया ही तात्पुरती आणि पर्यायी स्वरूपाची आहे. शासनाने कायद्याची अंतिम अधिसूचना घोषित केल्यानंतर अधिकृतरित्या विज्ञापन प्रसिद्ध करून पगारी पुजारी नियुक्त केले जातील, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी १८ जूनला पत्रकार परिषदेत दिली.

शासनाकडून चालू असलेली पगारी पुजारी नियुक्ती प्रक्रिया अनधिकृत असल्याचा आरोप काही संस्था आणि संघटना यांच्याकडून करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत जाधव आणि सचिव विजय पोवार यांनी न्याय अन् विधी खात्याच्या प्रधान सचिवासमवेत झालेली बैठक आणि त्यांनी सूचनेनुसारच ही प्रक्रिया चालू आहेे.

महेश जाधव म्हणाले की…

१. शासनाने १२ एप्रिलला संमत केलेल्या कायद्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि अंतिम अधिसूचना घोषित झालेली नाही. अधिसूचना घोषित होईल, त्या दिवसापासून देवस्थान समिती आणि परंपरागत श्रीपूजकांचे मंदिरावरील हक्क संपुष्टात येणार आहेत. त्या दिवशी विद्यमान पुजारी न्यायालयात जाणार आहेत. या घडामोडीमध्ये देवीची पूजाअर्चा आणि विधी यांमध्ये खंड पडू नये, यासाठी पूर्वसिद्धता आणि पर्यायी व्यवस्था म्हणून या निवडी करण्यात येत आहेत. त्यासाठी विज्ञापन देण्याची अनुमती दिलेली नाही.

२. नवीन समिती नियुक्त होऊन तिच्याकडे मंदिराचे सर्वाधिकार हस्तांतरित होईपर्यंत सर्व प्राथमिक व्यवस्था देवस्थान समितीकडूनच करण्यात येणार आहे. आंदोलकांनी चुकीच्या गोष्टी गृहित धरून आंदोलने न करता गोष्टी माहिती घेऊन देवस्थानला सहकार्य करावे.

३. कायद्यातील मसुद्यानुसार अधिकृतरित्या पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजार्‍यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. ते विशिष्ट जातीचे आहेत; म्हणून अन्याय केला जाणार नाही. तज्ञांसमोर झालेल्या मुलाखतीत ते पात्र ठरले, तर त्यांच्यासह आता निवडल्या जाणार्‍या पुजार्‍यांनाही भरती करून घेतले जाईल.