१९७२ च्या ११ वीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा उत्साहात!!

1127
जाहिरात

सांगली /कडेगांव- हेमंत व्यास :-

कडेगांव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या १९७१ते१९७२च्या ११वीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा झाला.या मेळाव्याचे आयोजन कडेगांवच्या महात्मा गांधी विद्यालयात करण्यात आले होते.विशेष म्हणजे शाळा, कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो.मात्र ज्या शाळेत,ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो लहानाचे मोठे झालो वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी विद्यार्थीनी बरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले ती नाळ मात्र तशीच असते.सर्वांना एकदा भेटावे एकमेकांशी हितगुज करावे असे सर्वांना वाटते

सत्तेचाळीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या नोकरी धंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही.मात्र ते अशक्यही नसते हे १९७२च्या महात्मा गांधी विद्यालयाच्या आकरावीच्या माजी विद्यार्थ्यांनी दाखवुन दिले आणि तब्बल सत्तेचाळीस वर्षापुर्वीच्या माजी विध्यार्थी, विद्यार्थीनींचा स्नेह मेळाव्याचे डॉ.धोंडीराम चौगुले, दिलिप खांबे व माधवराव देशमुख यांनी आयोजन केले.दुष्काळी भागांत ताऊन निघालेली ही मंडळी जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास सक्षम बनली आहेत.आणि यातच त्यांच्या यशाचे गमक आहे याची प्रचिती उपस्थितांना त्यांचे अनुभव ऐकताना येत होती.ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो,ज्या मातीने आपल्याला घडवले आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भुमीत शाळेत पुन्हा एकदा त्याच संवगड्यासह हितगुज करण्याची संधी उपलब्ध करून दिली.माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने ११वी नंतर एक दोन नव्हे तर चक्क ४७ वर्षांनी २२ विद्यार्थी विद्यार्थीनी एकत्र आले.या सर्वांचे स्वागत दत्तात्रय पाठक यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.धोंडीराम चौगुले व दिलीप खांबे यांनी केले आभार माधवराव देशमुख यांनी मानले.यावेळी कैलास दोडके,चंद्रकांत धस्के, जयवंत भस्मे,संपत तवर, डॉ.आनंदराव माळी,श्रीनाथ कुंभार, विलास जाधव,जयश्री कुलकर्णी,मंगल माने,प्रल्हाद रास्कर, बाळासाहेब देशमुख, शिवाजी मुलीक,रूक्मीणी सुपले आशालता काटकर,मंगल भोसले, पुरुषोत्तम शेरेकर, रामदास गुरव शोभा औंधकर इत्यादी माजी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.