विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाशिक जिल्ह्यातील चेअरमन, संचालका चा उद्या नाशिक येथे मेळावा

0
876
Google search engine
Google search engine

नाशिक :- उत्तम गिते – 

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाशिक जिल्ह्यातील चेअरमन, संचालका चा मेळावा ११ जुलै २०१८ रोजी १२ वा. एन.डी.सी बँक शेजारी एच.आर डी हॉल सी.बी.एस नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. वि.का सोसायटी संचालक वर तालुका निबंधक नोटिसा बजावून वसूल न झालेल्या कर्जास जबाबदार धरून फोजदारी कारवाई करण्याची बेकायदेशीर कारवाई करत आहेत.

वि.का सोसायटी मार्फत पीककर्ज अल्प वाटप होत  असल्यामुळे  संस्था अडचणीत सापडल्या आहेत. मंत्री व राज्य सरकार वेगवेगळे मत कर्जमाफी संदर्भात वेक्त करत असल्यामुळे शेतकऱ्यांना आशा लागत असल्यामुळे कर्ज वसुलीस अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे पीक कर्ज भरले तरी परत कर्ज उपलब्ध होईल याची खात्री देता येत नाही , पीक कर्जापासून बहुसंख्य शेतकरी वंचित आहेत . जिल्यात ५० च्या वर शेतकरयांनी आत्महत्या केल्या आहेत, कर्जमुक्तीचा प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. ग्रीन यादीत नाव येऊनही शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही, काही शेतकरी निकषात बसत असूनही त्याचे नाव आलेले नाही , नाशिक जिल्हा बँकेने पेरणीच्या काळात वसुली साठी जप्ती ची प्रक्रिया सुरू केली आहे .

या सर्व अडचणी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी व नाशिक जिल्ह्यातील वि.का सोसायटी फेडरेशन स्थापना करण्यसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र डोखळे, राजू देसले, विष्णुपंत गायखे, उत्तम खांडबहाले, संपतराव वक्ते, नामदेव बोराडे, राजाराम रायते, संजय तुंगार, भास्कर शिंदे,भाऊसाहेब शिंदे, दिलीप गायधनी, बबन मोरे, शिवाजी शिंदे, आनंद मोगल, राजाराम तिडके, साहेबराव गुंजाळ, तुकाराम गांगुर्डे, सुभाष निकम, भावराव पवार, गणपत कतेड  आदींनी केले आहे.