महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराला इंडियन शुगर मिल्स असोशियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहितदादा पवार यांची भेट

0
1000
Google search engine
Google search engine

न्युज फ्लॅश:हेमंत व्यास –

सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमीत येणाऱ्या प्रत्येक माणसाला उर्जा मिळते.सामाजिक राजकीय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे ठिकाण तीर्थक्षेत्रासारखे आहे.मीही इथ सकारात्मक उर्जा मिळवायला आलो आहे.ज्या गावाने महाराष्ट्राला एक महापुरुष दिला त्या देवराष्ट्रे गावाला आणि साहेबांच्या जन्मघराला भेट देणं ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे.”असे मत

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावात महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराला रोहीत पवार यांनी भेट दिली.यावेळी पवार यांच्या हस्ते चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

रोहीत पवार म्हणाले,”यशवंतराव चव्हाण यांचे वर्णन हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्यगिरी असं करण्यात आले आहे. हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची धमक असणारे साहेब ज्या गावाच्या पांढरीत जन्मास आले खरोखर हे गाव महान आहे.नवमहाराष्ट्राची निर्मिती करणारा शिल्पकार या गावाने दिला. नवमहाराष्ट्राची उभारणी करणाऱ्या चव्हाणसाहेबांच्या घरी आल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळाली आहे.”

यावेळी शेतकरी नेते परशुराम माळी, पत्रकार संपत मोरे,दिपक पाटील,एन एन यु आय चे राहुल पाटील,अजय शिंदे, नामदेव साळुंखे,उपस्थित होते.