दक्षिण मुंबई आज दुपार पर्यंत कडकडीत बंद

0
1137
Google search engine
Google search engine
नाशिक(उत्तम गिते)

मराठा समाजाला आरक्षण देण्यात शासनाकडून होत असलेल्या विलंबाने समाजात असंतोष निर्माण झाला आहे.आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलने चालू असताना मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री उलटसुलट विधान करून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथे मराठा समाजाचे एक समर्थक काकासाहेब शिंदे यानी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतली होती .

यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. म्हणून आज आंदोलन तिव्र करत असताना महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती .याचा एक भाग म्हणून आज दक्षिण मुंबईत कुंभारवाडा खेतवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यामध्ये मराठा समाजाचे सुरेंद्रनाथ निगुडकर , अनिल सुर्वे, सुशील निकम, संजय भनगे, अर्जुन गोळे, बाळकृष्ण मेहता, सचिन भगत, विनोद भातुसे, श्रीकांत भातुसे, किरण देटे, सिद्धेश भोसले, सुशांत निकम, नवनाथ गोळे, राजन, संतोष भातुसे, निखिल पवार, निलेश दुंदले, केतन शेडगे, महेश दिघे, दादा हंबिर, बिपीन भातुसे, नामदेव कदम, विशाल भनगे, आदित्य जंगम, अनिल राऊत, आणि इतर कार्यकर्ते यांनी आंदोलनात सरकार विरोधात निषेध नोंदवून आरक्षणाची मागणी करण्यात आली. तसेच आरक्षणासाठी बलिदान देणारे कै.काकासाहेब शिंदे याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.