पाटोदा येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोगनिदान शिबीर व रक्तदान शिबीर संपन्न

0
851
Google search engine
Google search engine

येवला प्रतिनिधी :-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी पाटोदा येथे औचित्य साधून मराठा विद्याप्रसारक समजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आडगाव व शिवसेना येवला तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथे सर्वरोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन शिक्षक आमदार संघाचे आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मारोतराव पवार हे उपस्थित होते.
या वेळी बोलतांना आमदार किशोर दराडे यांनी या सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर आयोजकांचे कौतुक करून हा उपक्रम सुस्त्य असल्याचे सांगून या शिबिरातून गरजूंना मोफत वैदकीय उपचार ,शस्रक्रिया करून मिळणार असल्याचे सांगितले.या शिबिरात कान,नाक.घसा,नेत्र तपासणी त्वचा रोग तपासणी ,पोटाचे विकार किडनीचे आजार,हस्तीरोग,अशा विविध रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे,देण्यात आली होती.या शिबिरात सुमारे ५०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.तसेच रक्तदान शिबिरात १०० पेक्षा जास्त तरुण तसेच नागरिकांनी त्याचे रक्तदान करून सहभाग घेतला.या वेळी माजी आमदार मारोतराव पवार,म.वि.प्र संचालक रायभान काळे,रतन बोरनारे,कैलास घोरपडे,आदींनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी माजी सभापती,संभाजीराजे पवार,प.स.सभापती नम्रता जगताप,नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर,डॉ सुधीर जाधव,अरुण काळे, कांतीलाल साळवे,शरद लहरे,विठ्ठल आठशेरे भास्कर कोंढरे,वाल्मिक गोरे,राजेंद्र लोणारी ,विठ्ठल शेलार,भागीनाथ थोरात ,अमोल सोनावणे,प्राचार्य रहाटळ, जयाजी शिंदे,कैलास खोडके,दीपक भदाणे,राहुल लोणारी महेश सरोदे,सरपंच अनिता धनवटे,साहेबराव बोराडे,सूर्यभान नाईकवाडे,पुंडलिक पाचपुते,विठ्ठल पिंपळे,तुळशीराम घनघाव,अशोक मेंगाणे,बाळासाहेब पिंपरकर ,जनार्दन भवर ,दिलीप बोरनारे,आण्णा दौंडे,प्रल्हाद बोरनारे,बाबासाहेब भुसारे,संपत बोरनारे,भावराव बोरनारे,बाळासाहेब पठारे,शिवाजी बोराडे,चंद्रभान नाईकवाडे,गणपत भवर,भाऊसाहेब ढोपरे,विजय सोर,दत्तात्रय जगताप,कारभारी बोरनारे, देविदास शेळके,शरद कुदळ शाम गुंड,गोरख अहिरे,सचिन शेलार,उस्मान शेख पोपट धनवटे,प्रभाकर बोरनारे,मारुती घोरपडे,आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी सूत्रसंचालन प्रा.भागवत शेलार यांनी तर आभार बाळासाहेब सोमासे यांनी मानले.