लहान मुलांमध्ये टीव्ही आणि मोबाईलमुळे दृष्टीदोष.

0
769
Google search engine
Google search engine

नाशिक / प्रतिनिधी

लहान बाळं जेवत नाही, हट्ट करतात म्हणून त्याच्यासमोर मोबाईल ठेवला जातो. जवळजवळ सर्वच घरांमध्ये ही परिस्थीती पाहायला मिळते. पण आपल्या लहानग्यांना मोबाईल हाताळण्यास देणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून तरी तुम्ही आपल्या चिमुरड्यांजवळ मोबाईल देताना दहा वेळा विचार कराल.

महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख लहान मुलांचे डोळे ‘आळशी’ बनलेत.या मुलांना ‘अम्ब्लोपिया’ नावाचा डोळ्यांचा आजार झालाय.मोबाईल, टीव्ही आणि टॅबच्या प्रकाशामुळं लहान मुलांमध्ये हा दृष्टीदोष वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.