विभागीय कृषी सहसंचालक तथा जलयुक्त’ अपहाराचा मुख्य सुत्रधार रमेश भताने सह दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीचे शासनाचे आदेश -वसंत मुंडे

0
1623
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील मतदार संघातील पूर्वी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात कोट्यावधी रूपयांचा घोटाळा करणार्या त्या भ्रष्ट 25 अधिकार्यांचे महाराष्ट्र शासनाचे विभागीय चौकशी करण्याचे आदेश दि.03 जुलै रोजी कृषी आयुक्त यांना प्राप्त होऊन आता यावर विशेष पथक नेमुन चौकशी करण्यात येणार असल्याची महाराष्ट्र काँग्रेसचे ओ.बी.सी. विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिलेल्या एका प्रसिध्दीपत्रकात माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मागील दोन महिन्यांपासून परळी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा गाजत आहे. कोट्यावधी रूपयांची सिंचनाची कामे केवळ कागदावरच दाखवून निधी लाटला गेला असल्याचे प्रकार चौकशीत समोर आले आहेत. यावरून कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कमेटीचे पदाधिकारी वसंत मुंडे यांनी हे प्रकरण मंत्रालयापर्यंत लावून धरले होते. त्यावरून दि.03 जुलै रोजी क्रमांक.विचौप्र-2017/प्र.क्र.111/5ए. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे यांना म्हटले आहे की, रमेश भताने, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, बीड व इतर अधिकारी यांच्यासह संबंधितांविरूध्द महाराष्ट्र राज्य नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1978 मधील नियम 8/12 नुसार शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करावा असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.या प्रकरणात भताने यांच्यावर काय कारवाई होते. तसेच यात कोण कोण आणखी गळाला लागतय त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

तरी कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे विभागीय सह संचालक रमेश भताने यांच्या निलंबणासाठी व भ्रष्ट अधिकार्यां व गुत्तेदार व मजुर संस्थेचे पदाधिकारी यांना अटक करण्यासाठी शासनस्तरावर एक पथक नेमुन आता या अधिकार्यावर कारवाई होणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे ओ.बी.सी.विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हाचे निरीक्षक वसंत मुंडे यांनी दिलेल्या एका प्रसिध्दीपत्रकात यानी माहिती दिली आहे.