निफाडला आज विविध विकासकामांचे भुमिपुजन आमदार अनिल कदम यांच्या हस्ते होणार

0
653
Google search engine
Google search engine

निफाड (प्रतिनिधी)
नवनिर्मित नगरपंचायत सहाय्यभुत निधीतून निफाड नगरपंचायतीमधील विविध प्रभागांतील विकासकामांचे भुमिपुजन शनिवार दि.४ सकाळी १० वाजता आमदार अनिल अण्णा कदम यांच्या हस्ते होणार आहे.
विकासकामांमध्ये अहिल्यादेवी नगरमधील अंगणवाडी ते र्इश्वर पेंढारकर यांच्या घरापर्यंत ओपन कॉक्रीट गटारिचे उद्द घाटन सकाळी १० वाजता गणेश नगर येथील बाबुभाई माणियार याच्या घरापासून ते प्रतिक लोहरा यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण सकाळी १०.२० वाजता लक्ष्मी नगर येथील नंदूकाका चोरडिया ते दिनेश भटेवरा यांच्या घरापर्यांत रस्ता कॉक्रीटीकरण सकाळी १०.३० वाजता संगमेश्वर कॉलनी रस्ता कॉक्रीटीकरण सकाळी १०.५० वाजता अपर्णा सोसायटी रस्ता कॉक्रीटीकरण सकाळी ११.३० होणार आहे
या विविध विकास कामांच्या उद्दघाटन समारंभप्रसगी निफाड नगरपंचायती सर्व नगरसेवक व शहारातील मान्यवर उपस्थित राहणार असून शहरातील नागरिकांनीही यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.