मुंबई येथील छावा युवा संघटना तर्फे आज आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

0
1350
Google search engine
Google search engine

मुंबई :- प्रतिनिधी

छावा युवा संघटनाच्या वतीने घाटकोपर येथील आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी मोठ्यासंख्येने ठिय्या आंदोलन करण्यात आले. घाटकोपर छावा युवा संघटना बांधव यांनी देखील ठिय्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. त्या ठिकाणी अनेक समन्वयकानांनी शासना मागण्यांना दिरंगाई करत अशी खतखत व्यक्त करत भाषण केली.

या वेळी त्यांनी म्हंटले की मराठा समाजाच्या मुलांवर ३०७ कलम सारखी टाकण्यात आलेल्या केसेस मागे घ्याव्या,लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, सारख्या प्रमुख मागण्यांसाठी छावा युवा संघटना मुंबई तर्फे आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्या वेळी प्रांत अध्यक्ष शिवश्री उल्हास भाऊ पाटिल,मुंबई कार्याध्यक्ष शिवश्री भिमराव गमरे,महाराष्ट्र राज्य संघटक शिवश्री सुशील निकम, शिवश्री नथुराम मेस्त्री,शिवश्री संतोष बागम,मुंबई उपाध्यक्ष शिवश्री विशालभाई लादे, तसेच मनीष भागडे, संतोष मोरे, प्रकाश जाधव, आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.