निफाड तालुक्यात खरीप कोमात ; शेतकरी चिंतेत*

0
824
Google search engine
Google search engine

समाधान कोकाटे
निफाड तालुका प्रतिनिधी

निफाड :-

खरिपातील पिके ऐन जोमात असतानाच पुन्हा पावसाने मोठीउघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आले पिक वाया जात असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर आहे. गेल्या महिन्यापासून पाऊसाचा थेंब पडला नाही. सोयबीनसह इतर पिकांनी माना टाकल्याचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच कापसावरही बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना बँके कडून तसेच हात उसणे पैसे उचलून पेरणी केलीहोती. आता पिकांनी माना टाकल्यामुळे आलेले पिक उपटून टाकायची वेळ आली आहे. पाऊस नाही पडलातर पुढील रब्बी हंगामातील पेरणी देखील शेतकऱ्यांना करणे आवघड आहे. अशी परिस्थिती राहिली तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होऊ शकते. शासन ही शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेत नसल्यामुळें शेतकरी व्दिविधा मनस्थती मध्ये पडला आहे. तालुक्यातील व आजुबाजुच्या परिसरात चार दिवसात जरपाऊस नाही पडला तर हातची आले पीके वाया गेल्या शिवाय राहणारनाहीत. परिसरात सध्यातर दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याने सांगितले.जुनच्या पहिल्या आठवड्यात खरीपाची पेरणी सुरुवात करण्यात आली होती. पेरणीसाठी चार हजार, खत आणि बियाणे चार हजार, खुरपणी कोळपणी तीन हजारे एकरी खर्च करण्यात आला आहे. तरी पाऊसाने उगाड दिल्यामुळे आले पिके देखील हातची जाण्याची शक्यता आहे