कै.जडाबाई दुगड शाळेचे कार्य कौतुकास्पद : प्रशांत लोणकर

0
1966
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे

शिक्षण घेत असताना मन लावून शिक्षण घ्या तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपल्या कुटुंबाची, भागाची, देशाची प्रगती साध्य करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. देशाचे भवितव्य शिक्षणात आहे. पुढे जायचे असेल तर शिक्षणातूनच जाऊ शकता. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घवघवीत यश मिळवून यशोशिखर गाठा. आपल्या शाळेने अनेक मोठे विद्यार्थी घडविले आहेत त्यामुळे आपली शाळा कै.जडाबाई नारायणदास दुगड शाळेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य या शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत लोणकर यांनी यावेळी केले. निमित्त होते ते माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावाचे.

कै.जडाबाई दुगड कोंढवा खुर्द येथील शाळेचे माजी सन २००२- २००३ मधील दहावीचे विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आपणही शाळेचे काही देणे लागतो या माध्यमातून ज्या शाळेत आपण शिकलो , ज्या शाळेने आपल्याला घडविले त्या शाळेबद्दल कृतज्ञता म्हणून प्रयोग शाळेतील शैक्षणिक साहित्य आणि गरजू ४० विद्यार्थ्याना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. याप्रंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती ननावरे मॅडम, भालकेसर, देशमुखसर, कुंजीरसर , कुलकर्णी सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत लोणकर, धनंजय पोकळे, तुषार चव्हाण, पंकज जाधव, विनायक ठोके, विलास पाखरे, देविदास दरेकर, सनी गोंधळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रिजवान शेख यांनी केले होते.