पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे, पेट्रोल लवकरच शतक गाठेल

0
748
Google search engine
Google search engine

पेट्रोल लवकरच शतक गाठेल
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे

पेट्रोल-डिझेलचा समावेश सेवा करामध्ये करा : अर्थमंत्री मुनगंटीवार

:पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी दरवाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.91 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेल 75.96 रुपये झालं आहे. मुंबईतील पेट्रोल दराचा हा उच्चांक आहे.
जागतिक स्तरावर कच्चे तेल व्यापाराच्या दोन मुख्य मानकांमध्ये डिसेंबर २०१४ नंतर मोठी तेजी आलेली आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट ७०.०५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला, तर WTI ६४.७७ डॉलरवर गेला. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणे सुरू झाले.

दुसरीकडे राज्यात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत आहे. इथे प्रति लिटर पेट्रोलसाठी तब्बल 88.17 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पेट्रोलची वेगाने शतकाकडे वाटचाल सुरु असून, पेट्रोल शतकापासून अवघे 12 रुपये दूर आहे.

महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इथे पेट्रोलचा आजचा दर 87.96 रुपये लिटर इतका आहे.

महाराष्ट्रात अमरावतीत सर्वात महाग पेट्रोल

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीतील आजचा पेट्रोल दर हा 88.17 रुपये प्रति लिटर इतका आहे. काल हा दर 87.97 रुपये इतका होता. त्यामध्ये आज 19 पैशांनी वाढ झाली.