कामगार मंडळ कर्मचारी संघटनेच्या नाशिक येथील बैठकीत मोठा प्रतिसाद

0
795
Google search engine
Google search engine

कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांची प्रमुख उपस्थिती
परळी: नितीन ढाकणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेची बैठक नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली. बैठकीला नाशिक विभागातील मंडळाचे कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
बैठकीला भारतीय बहुजन कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, किमान वेतन कायदा मंडळाचे सदस्य विक्रम नागरे, संघटनेचे अध्यक्ष नितीन निंभोरकर, महासचिव संदीप कुलकर्णी, प्रकाश गायकवाड, भगवान जरारे, शिवाजी वाघ, महेश धांडे, जिज्ञेश पाटील, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.
नाशिक विभागातील कामगार मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या जाणून त्यांना संजय केणेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नाशिक विभागातील राजेश परदेशी, अजय निकम, गाडीलोहार, दीपक पाटील, संजय पवार, कौस्तुभ कुलकर्णी, निलेश पटवारे, निलेश वाघ, योगेश पाटील, सुनिल पवार, बाळकृष्ण लांडगे यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.