वेळ आली तर… वाहन चालकांची ताकद दाखवून देऊ – श्री संजय हळनोर >< राज्यातील पहिली वाहन चालक संघटना

0
1375
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )

 

वेळ आली तर, वाहन चालकांची ताकद दाखवून देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय हळनोर यांनी व्यक्त केली आहे. ते द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबीरात बोलत होते.

यावेळी हळनोर म्हणाले की, वाहन चालकांमुळेच शासन चालते अन्यथा कोणतेही मंत्री, अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेते दौरे करू शकले नसते. त्याचबरोबर संपूर्ण कामकाज, दळणवळण बंद होऊ शकते. तसेच सामान्य जनतेनी सरकारला प्रश्न विचारून “सळो की, पळो” अशी अवस्था केली असती अशी संतप्त प्रतिक्रिया जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय हळनोर यांनी व्यक्त केली असून अपघात झालेल्यांना कोण मदत करत नाही, अश्यात वाहन चालकांनीच अपघातग्रस्तांना मदत म्हणून रक्तदान करून देवदूत बनले आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वाहन चालकांच्या पुढील समस्या, अपघात समई वाहन चालकाला जनतेने कोणत्याही प्रकारची मारहान करू नये, केल्यास संबंधीत जनतेवर गुन्हा दाखल करावा. शहर सोडुन शहराबाहेर पोलीस गाड्या अडवुन विनाकारण वाहन चालकाची पिळवणूक करतात. तसेच अपघातात वाहन चालकाला ५० टक्के अपंगत्व आल्यास १० लाख रूपये व अपघातात जर मरण पावल्यास चालकांच्या परिवाराला शासनातर्फे २० लाख रूपये मदत मिळावी. अशा विविध समस्या शासन दरबारी निवेदनाद्वारे मांडण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. रक्तदान करणाऱ्यांनी आपले रक्त कोणाचा तरी जीव वाचवेल यामुळे आम्ही रक्तदान करत आहोत असे रक्तदानाला उपस्थित असणाऱ्या वाहन चालकांनी सांगितले. तसेच औरंगाबाद आरटीओ अधिकारी स्वप्नील माने यांनी संघर्ष ग्रुपचे कौतुक केले. संघर्ष ग्रुप चालकांचे काम कौतुकास्पद आहे .कारण ते वाहन चालकांना सर्व पध्दतीने मदत करतात. सीटबेल्ट वापरावे, हॉर्न विणाकरण वाजवू नये. जेणेकरून वयोवृद्धांना आवाजाचा त्रास होणार नाही. सर्व चालकांनी वाहतूकीचे सर्व नियम पाळावे असे आव्हान त्यांनी उपस्थित वाहन चालकांना केला.

यावेळी जय संघर्ष ग्रुपला त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक संजय हळनोर यांना मानपत्र व सन्मानचिन्ह अध्यक्ष रामनाथ जर्हाड, राज्य सचिव अर्जुन अरगडे, राज्य संघटक सचिन उपाध्ये, सरचिटणीस गणेश खेमनर आदीच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थापक संजय हळनोर, आलमभाई शेख, महासचिव सलीमभाई बिनसाद, संपर्कप्रमुख अहमदनगर जिल्हा नवलशेठ बोरा, नियोजन प्रमुख अहमदनगर जिल्हा तसेच जय संघर्ष वाहन चालक संस्थेचे वाहन चालक सभासद महाराष्ट्र, कर्नाटक विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तसेच रवी शेळके, रमेश कोलते आदींनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.