कामगार कल्याण मंडळाच्या दिनदर्शिकेचे राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते विमोचन

0
1247
Google search engine
Google search engine

 

कामगारांना विविध योजना उपक्रमाची माहिती देणारी दिनदर्शिका

परळी: नितीन ढाकणे, दिपक गित्ते  : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने कामगार व कामगार कुटुंबियांना उपयुक्त असलेल्या योजनांची माहिती देणारे दिनदर्शिकेचे विमोचन कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेच्या वतीने कामगारांना उपयुक्त ठरेल अशी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. या दिनदर्शिकेचे विमोचन कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे महासचिव संदीप कुलकर्णी, आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय मोहरकर यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले आहे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून कामगार व कामगार कुटुंबियांना कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती होईल. यात कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, पाठ्यपुस्तक सहाय्यता योजना, एमएससी आय-टी अनुदान योजना, गंभीर आजार सहाय्यता योजना यासह विविध उपक्रमांची कार्यक्रमांची माहिती यात अंतर्भूत करण्यात आली आहे.
याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार व कामगार कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात होईल.