कठोरा बु येथील गजानन टाऊनशीप येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन- शहरालगतच्या वस्त्यांमध्ये सुविधांसाठी शासनाला प्रस्ताव – पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

0
596
Google search engine
Google search engine

Amravati :-

शहरालगतच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पेयजल आदी सुविधांसाठी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह चर्चा करून शासनाला सुमारे 400 कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा नियोजन निधी अंतर्गत मंजूर गजानन टाऊनशीप, कठोरा बु पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. खासदार आनंदराव अडसूळ, पं. स. सदस्य प्रवीण अळसपुरे, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, मजीप्राचे श्री. पोपुलवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, शहरालगतच्या वाड्या वस्त्यांमध्ये सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून निधी मिळण्यासाठी शासनाला पाठपुरावा करण्यात येईल. जिल्हा वार्षिक निधीतून सव्वादोन कोटी रुपये खर्चून कठोरा बु येथील गजानन टाऊनशीप पाणीपुरवठा योजना आकारास येणार आहे. विश्रोली धरणावरील 105 गावे पाणी पुरवठा योजनेतून ही पाणीपुरवठा योजना चालेल. नागरिकांनीही पाणीपट्टी नियमित भरणे, पाण्याचा उचित वापर आदीबाबत दक्षता घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.