बाळापूर पोलिसांची अवैध धंद्या विरुद्ध धडक कारवाई

331
जाहिरात

,

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला/प्रतीनिधी

आगामी लोकसभा निवडणूक व आचार संहिता लक्षात घेऊन, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन बाळापूर हद्दी मध्ये अवैध दारू व जुगार ह्या वर नियंत्रण मिळविण्या साठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली हे पथक दररोज पोलीस स्टेशन क्षेत्रात छापा मारून कारवाया करीत आहे, बाळापुर पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मागील 3 दिवसात खात्री लायक माहिती वरून लाखनवडा शिवारात तास पत्त्यावर खेळणाऱ्या एकूण 5 इसमावर कारवाई केली त्या पैकी संदीप वामन गुड दे, दीपक रामभाऊ गुडदे, पंडित भिकाजी इंगोले ह्यांना ताब्यात घेतले.व युवराज उदयभान इंगोले व रतन गुडदे हे मात्र निसटलेत.त्यांचे कडून नगदी 490 रुपये, एक मिक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 रुपये, एक मोटारसायकल पॅशन प्रो कंपनीची किंमत अंदाजे 40,000 रुपये असा एकूण 50,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच लाखनवडा येथेच वरळी मटक्यावर जुगार घेणारा विलास सूर्यभान सिरसाट ह्याला ताब्यात घेऊन त्याचे कडून नगदी 515 व साहित्य जप्त करण्यात आले तसेच दिनांक 19।3।19 रोजी खात्रीलायक माहिती वरून पारस फाटा येथे नाकाबंदी करून मोटार सायकल वरून अवैध रित्या कत्तल करून गोमांस वाहून नेणाऱ्या शेख फारुख शेख नजीर राहणार पारस, ह्याला ताब्यात घेऊन त्याचे कडून 50 किलो गोमांस व मोटारसायकल किंमत 52,500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी 23।3।19 पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली, तसेच आज दिनांक 20।3।19 रोजी माहिती मिळाल्या वरून अकोला नाका येथे नाकाबंदी करून अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणारे ,देवानंद भीमराव बावणे, व मंगेश निरंजन सुरुशे दोघे राहणार मनारखेड ह्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून 18 देशी दारू क्वार्टर किंमत 936 रुपये व स्टार सिटी मोटारसायकल किंमत 25,000 रुपये असा एकूण 25, 936 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, 3 दिवसात अवैध दारू, जुगार, गोवंश वर धाडी घालून एकूण 1,29,621 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, राठोड, हर्षल श्रीवास, कायंदे ह्यांनी केली

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।