टिक-टॉक ऍपवर बंदी आणण्याचे आदेश – प्ले स्टोअर मधून डिलीट होणार …?

0
1309
Google search engine
Google search engine

तरुणाईमध्ये सोशल मिडीयात प्रचंड पेझ असणाऱया टिक-टॉक अँप्सवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने गुगल आणि अँप्सला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अँप्स हटविण्यास सांगितले आहे. सरकारच्या या आदेशानंतर लोकांना आता टिकटॉक अँप्स डाउनलोड करता येणार नाही. मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अँप्स आहे त्यांना तो आता पहिल्यासारखा वापरता येणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर हे आदेश देण्यात आले आहेत. टिकटॉक अँप्स सोशल मिडीयामध्ये तरुणाई प्रसिद्ध अँप्स आहे. मात्र काही जणांकडून या ऍपचा गैरवापर करण्यात येत असून अश्लिल चित्रफितींना प्रोत्साहन देण्यासाठी टिकटॉकचा वापर करण्यात येतो असा आरोप करत याविरोधात मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. टिकटॉकवर बंदी आणावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती.