नागपुर – औरंगाबाद हायवेवर दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक घुईखेड जवळील घटना,- दोन्ही ट्रकांच्या कॅबीन चकनाचुर

328
३ गंभीर जखमी
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
नागपुर – औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर तांदुळाचा ट्रक व डांबराचा टँकर यांच्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जवळ झालेल्या समोरासमोरील भिषण अपघातात ३ गंभीर झाल्याची घटना बुधवारी (ता. १५) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्तमाहितीनुसार, एमएच १६ सीसी ७५७१ क्रमांकाचा ट्रक भंडारावरून मुंबईच्या दिशेने तांदूळ घेऊन जात असतांना एमएच ४६ बीबी ६९३७ क्रमांकाचा डांबराचा टँकर नागपुरच्या दिशेने जातांना ओव्हरटेकच्या नादात घुईखेड ते चंद्रभागा नदीजवळील शरद गुल्हाणे यांच्या शेताजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये तांदूळाच्या ट्रकाचा ड्रायव्हर संजय भिमराव सिरसाठ (२६) रा. टेंभुर्णी ता. शिरूर जि. बीड, क्लिनर दिपक खेडकर (१९) रा. आगासखेड ता. पाथर्डी जि. अहमदनगर व डांबराच्या टँकरचा ड्रायव्हर असे तिघे गंभीर जखमी झाले असुन तिघांनाही १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिनीने रूग्णालयात भरती करण्यात आले. सदर अपघात एवढा भिषण होता की दोन्ही ट्रकच्या कॅबीनचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातानंतर बराच वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. यानंतर देवगाव महामार्ग पोलीसांनी वाहतुक सुरळीत केली. सदर घटनेचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात एएसआय वसंत राठोड, हे.काँ. सुरेंद्र कोहरे करीत आहे
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।