*शिर्डी येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंचांचा सन्मान सोहळा-सरपंच सेवा संघ महाराष्ट्रराज्याचा उपक्रम*

357
जाहिरात

(अमरावती)

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र आयोजित दि.२८ मे २०१९ मंगळवार रोजी हॉटेल शांतीकमल परिसर शिर्डी येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच व उद्योजक पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा हेणार आहे

महाराष्ट्रतुन सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन आदर्श सरपंचाना पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार आहे, याच कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्य पदाधिकारी यांना शपथविधी व सरपंच सेवा संघाचे स्मरणिका प्रकाशन व वेबसाइटचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे राज्याध्यक्ष सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य, तर प्रमुख अतिथी म्हणून विजय कुवळेकर संपादक,झी 24 तास वृत्तवाहिनी,यादवराव पावसे संस्थापक, सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य, तृप्ती देसाई अध्यक्षा भूमाता ब्रिगेड संघटना महाराष्ट्र, चंद्रकांत दळवी आयुक्त महाराष्ट्र राज्य, सुरेशराव कोते कार्यकारी संचालक लिज्जत पापड पुणे,एकनाथराव ढाकणे राज्याध्यक्ष ग्रामसेवक युनियन महाराष्ट्र राज्य, लालुशेठ दळवी जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ, भास्कर पेरे पाटील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच पाटोडा, बाबासाहेब पावसे सरचिटणीस सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत समारोप संपन्न होणार आहे,
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील दोन हजार सरपंच उपस्थित राहणार आहेत, आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंचांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, सरपंच फेटा, मेडल देऊन आदर्श सरपंचांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पुरुषोत्तम घोगरे राज्याध्यक्ष सरपंच सेवा संघ महाराष्ट्र,बाबासाहेब पावसे सरचिटणीस सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांनी दिली व महाराष्ट्रातील सरपंचानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अमरावती जिल्हा सरचिटणीस राहुल उके यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।