सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राला कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी दिली भेट

0
457
Google search engine
Google search engine

खालिद पठाण / सिंदेवाही-

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीट अकोलाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, विद्यापिटाचे कुलसचिव डॉ. पी.आर. कडू व डॉ. ठाकुर यांनी सिंदेवाही पंजाबराव कृषी संशाधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्रास नुकतिस भेट दिली. या प्रसंगी कृषी संशोधन केंद्राच्या नविन प्रस्तावित प्रशासकीय इमारती संदर्भात चर्चा केली. प्रत्यक्ष भेटी दरम्यान भात संशोधन विषयी तसेच धान बिज उत्पादन तथा विद्यापिटाचे तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधावर नेण्यासंबंधी विशेष मार्गदशन व सूचना केल्या. काही दिवसांपुर्वी प्रक्षेत्रालगत लागलेल्या आगीमुळे झालेल्या फळबागाची नुकसानाची पाहणी केली. यावेळी कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. उषा आर डोंगरवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, डॉ. पी. के. राठोड, ए. ए. नागदेवे, एल. एन. डोंगरवार, एम. पी. मसवडकर, एस. एम. सरोदे, हवामान निरीक्षक डी. एम. गनवीर, व्ही. जे. राउत आदि उपस्थीत होते.