आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत ३३ विद्यार्थ्यांची निवड

0
528
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (Shahejad Khan)

चांदूर रेल्वे तालुक्यातील दुर्बल घटकातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठीची दुसरी आॅनलाइन यादी जाहीर केली आहे. या यादीत चांदूर रेल्वे शहरातील व तालुक्यातील ३३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १७ जून ते २७ जूनपर्यंत शाळा प्रवेश घेणे बंधनकारक  आहे.

राज्यातील कायम विना अनुदानित सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांच्या तसेच सर्व मंडळांशी संलग्न शाळांमध्ये (अल्पसंख्यांक शाखा वगळून) आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१८- २०१९ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन करण्याचे प्रस्तावित केले असून चांदूर रेल्वे येथील शिक्षण विभागानेदेखील २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार चांदूर रेल्वे शहरातील ३ आणि तालुक्यातील १ शाळांनी आॅनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरली होती. तसेच पालकांनी देखील आॅनलाईन पद्धतीने आरटीईसाठी आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल केले होते. दुसऱ्या यादीच्या सोडतीमध्ये जिंगल बेल इंग्लिश स्कुलमध्ये १०, लिटील स्टार इंग्लिश स्कुलमध्ये ७, राजर्षी शाहु इंग्लिश स्कुलमध्ये १५ व घुईखेड येथील श्रीमती कमलाबाई टावरी इंग्लिश स्कुलमध्ये १ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. असे एकुण ३३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या सोडतीत लॉटरी लागली आहे.