मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महाजनादेश यात्रा

151
जाहिरात

मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित
” पण “
बुलडाणा : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापूर,नांदुरा ,खामगाव ,शेगाव इथे दिली.

यापूर्वी महापुरामुळे व जेष्ठ नेत्या सषमा स्वराज यांच्या निधणाने महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून धुळे नंदूरबारपासून सुरु झाला. मात्र आज अरुण जेटलींचं निधन झाल्याने पुन्हा एकदा ही महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

महाजनादेश यात्रा आज जळगावच्या जामनेर येथून बुलढाणा जिल्ह्यात आली. तेव्हा कुठलेही स्वागत न स्वीकारता सरळ मुख्यमंत्री मलकापुर खामगाव ,शेगाव च्या स्टेजवर पोहोचले. . त्यानंतर पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या निधनाने फार मोठी हानी झाल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले नेते म्हणून जेटली यांची कारकीर्द मोठी होती, ते निष्णात वकील होते, अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक गावी आपल्या छोट्याश्या पण विरोधकांवर अगदी राजीव गांधी याच्यावर लागलेल्या बोफोर्स च्या आरोपापासुन तर सध्या हायकोर्टाच्या निर्णयाने सहकार शेत्रातिल गुऩ्हेगारांवर गुऩ्हे दाखल करु पर्यंत फडनविसांनी तोंड सुख घेतल गजानन महाराजांचा आशिर्वाद आज तर घेतच आहे पण परत निवडनुकित किंवा त्याही अगोदर मि येईन आणी तुमचा व गजानन महाराजांचा आशिर्वाद घेवुन जाईल अस मुख्यमंत्री बोलले शेगावी २० मिनिटांच्या भाषणात स्थानिक आमदार संजय जी कुटे म्हणुन तेबोलले व त्यांच्या कामाची स्तुति सुध्दा त्यांनी केली यावेळी पुरग्रस्त महाराष्ट्रा करीता आमदार कुटेंनी मतदार संघातुन पाच लाख ,चिखली अर्बन बैंकेने दोन लाख तर श्वेता महाले चीखली भाजपा च्या कडुन ऐक लाख रु याचे चेक मुख्यमंत्री यांना सुपुर्त करण्यात आले त्यानंतर भाषण आटोपून मुख्यमंत्री फडणवीस रवाना झाले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।