शिक्षक दिनी शिक्षकांची शाळेकडे पाठ, दोन दिवसापासून अनधिकृतरीत्या शाळा बंद

0
647
Google search engine
Google search engine

दि.५ सप्टेंबर २०१९-

पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा जुनगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा बुधवार आणि गुरुवार दोन्ही दिवस बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र बाहेरगावावरून ये जा करणाऱ्या येथील सातही शिक्षकांना विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक नुकसानीचे काहीही देणे-घेणे नसल्याचे जाणवत आहे. आज गुरुवारी सर्वत्र शिक्षक दिन साजरा करीत असताना जून गाव येथील शिक्षक मात्र पूर्णपणे शाळा बंद ठेवून घरी बसले. यापूर्वीही एक दिवस एकच शिक्षकाने शाळा भरवली होती. व बाकीचे सहशिक्षक गैरहजर होते. त्यामुळे शिक्षक हे शिक्षणाप्रती किती जागृत आहेत याची प्रचिती येते. तद्वतच वरिष्ठांनी या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे हे शिक्षक असे वागत असून शिक्षणाचा व शाळेचा दर्जा घसरला आहे.

शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.

जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही, तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.

डॉ. राधाकृष्णन उत्कृष्ट शिक्षकाची व्याख्या करतात ‘शिक्षकाने कमीतकमी शिकवून विदयार्थी स्वतः अधिकाधिक शिकेल यासाठी त्‍याला प्रशिक्षित केले पाहिजे.
शिक्षकाने स्वत: शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणा-याने सतत शिकत राहायला हवे. त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विदयार्थी म्हणूनच जगायला हवे.
शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विदयापीठ असते. विदयार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा ख-या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो.
परंतु दुर्दैवाने जुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अशा शिक्षकांची वानवा आहे. जगाला घडवणारे शिक्षकच जर शाळेला बुट्ट्या मारत असतील तर त्यांना वठणीवर आणण्याचे काम संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी करायला हवे. दिनांक चार आणि पाच सप्टेंबर रोजी जुनगाव येथील शाळा ,शिक्षक दिन असूनही बंद ठेवणाऱ्या व शिक्षक दिन साजरा न करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख, माजी सरपंच जीवनदास गेडाम आणि पालकांनी केली आहे.