*वृत्तपञे विक्रेते संजय जोशी यांना पत्नीशोक

0
699
Google search engine
Google search engine

*वृत्तपञे विक्रेते संजय जोशी यांना पत्नीशोक*

आकोटः- येथील वृत्तपञे विक्रेते संजय जोशी यांच्या पत्नी सौ.सिमा जोशी(४६)यांचे २५ सप्टेंबर ला सकाळच्या सुमारास नागपुर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

सिमा जोशी हया धार्मिक वृत्तीच्या,मनमिळावु व कुटुंब वत्सल होत्या त्याच्या मागे पती संजय व मुलगी शिवानी असा आप्त परीवार आहे.त्यांचे वर रामेश्वर स्मशानभुमी येथे शोकाकुल वातावरणात कु शिवानी जोशी हिने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभुमी येथे रा.स्व.संघ, आकोट तालुका पञकार संघ, महाराष्ट्र वृत्तपञ वि.संघटना, आकोट वृत्तपञ विक्रेता संघटना,आकोट नगर परीषद, भा.ज.पा.श्री.नरसिंग मंदिर, श्री.केशवराज मंदिर श्री.राम मंदिर संस्थान, श्री.सरस्वती व श्री.नरसींग शैक्षणिक संकुल, वैभव नागरी पतसंस्था,ब्राम्हण सभा,परशुराम जयंती उत्सव समीती,श्री नवयुग वाचनालय आदि संस्था, संघटनातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. श्रध्दांजली सभेचे संचलन अॕड.मोहन आसरकर यांनी केले.त्यांचे अंन्त्ययाञेत समाजाच्या सर्वच स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.