श्री शिवाजी महाविद्यालयात पोषण घटक विषयक स्पर्धा आकोटः प्रतीनिधी

0
587
Google search engine
Google search engine

श्री शिवाजी महाविद्यालयात पोषण घटक विषयक स्पर्धा

आकोटः प्रतीनिधी
स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय येथे पोषक घटक विषयक “ओळखा पाहू” ही स्पर्धा गृह अर्थशास्त्र विभाग व नरसिंग महाविद्यालयाच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या, विद्यमाने प्राचार्य डॉ ए एल. कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विविध अन्नपदार्थातील पोषक घटक ओळखायचे होते. या स्पर्धेचा उद्देश आहार व पोषक घटक यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा आहे. याप्रसंगी गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्वाती वैद्य डॉ. बबीता हजारे यांनी विविध पोषक घटकांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या स्पर्धेत एकूण साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु समृद्धी लहाने, द्वितीय क्रमांक रोशनी वडतकर, तृतीय क्रमांक मुक्ता गावंडे तर प्रोत्साहनपर क्रमांक कु वैष्णवी भगत व कु वैष्णवी डिकर यांनी पटकावला. उत्कृष्ट स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा मंजू मळसने प्रा. शारदा सावरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु गुप्ता, कु गौरी वसु, कु पूनम पुंडकर, कु निकिता नारे, कु मिसाळ, कु अस्वार, कु. नागोसे, कु. धनश्री रेखाते, कु गायत्री महाले, कु देवश्री चौधरी,ईत्यादी मुलींनी अथक परिश्रम घेतले. असे प्रसिद्धीप्रमुख प्रा अरूण हिंगणकर कळवितात.