तोंडोलीत अंबिका मंदिराचा कलशरोहण कार्यक्रम उत्साहात

0
703
Google search engine
Google search engine

तोंडोली(ता.कडेगाव) येथील अंबिका मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमानिमित्त मंदिरास विद्युत रोषणाई करणयात आली.देवीची विवीध स्वरुपात  पुजा मांडण्यात आली होती.मंदिर परीसर पहाटे स्वच्छ करुन मंदिरासमोर व नगरप्रदक्षीणा मार्गावरती रांगोळी सडा टाकण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी परीसरातील भक्तांना व गावातील माहेरवाशीणींना विशेष निमंत्रण देऊन बोलावण्यात आले होते.दोन दिवसाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रासह कर्नाटक, कोकण,परीसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर होते. पहिल्या दिवशी अंबामातेच्या कलशाची सकाळी नऊ वाजता विधिवत पुजाकरुन नगरप्रदक्षिणेसाठी रवाना करण्यात आली.देवीच्या कलशासमोर हत्ती,घोडे ,उंट,झांजपथक,हलगी,करंडीढोल-ताशा,कुंभार समाजाचा देवीचा मानाचा गोंधळ व माहेरवाशीणी,सासूरवासशीणींसह भाविकभक्तांनी शिवअंबेचा जयघोषात नगरप्रदक्षीणा करण्यात आली.दूपारी माहेरवाशीणींची ओटीभरण कार्यक्रम व अन्नदान करण्यात आले.तर दूस-या दिवशी भजन किर्तन व दूपारी बारा वाजता कलशारोहण कार्यक्रम कोल्हापुर करवीरपीठाचे जगदगूरु श्री शंकराचार्य विद्यानरसिंह भारती यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साेहात पार पडला.सकाळी आकरा ते रात्री नऊ पर्यत अन्नदानाचा कार्यक्रम अन्नदाते विजय सुर्यवंशी यांचे कडून करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट मुंबई-ठाणे व तोंडोली गावचे ग्रामविकास मंडळ तसेच ग्रामस्थ यांचे कडून  करण्यात आले होते.