बीडमध्ये वंचित च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

0
545
Google search engine
Google search engine
बीड( प्रतिनिधी )वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची बीड येथील माने कॉम्प्लेक्स मैदानात 13 आँक्टोबर रोजी प्रचंड जाहीर सभा होत असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान बीडचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकर सुखदेव हिंगे, गेवराई विधानसभाचे विष्णू  देवकते माजलगाव विधानसभेचे धम्मानंद साळवे, केज मतदार संघाचे वैभव स्वामी, आष्टी मतदार संघाचे नामदेव सानप तर परळी मतदार संघाचे भीमराव सातपुते या सर्व उमेदवारांच्या प्रचारात जाहीर सभा होत आहे.
 वंचित बहुजन आघाडी च्या जिल्ह्यातील  सर्व उमेदवारांना  मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे सभा घेत असून या सभेला नेते अॅड.अण्णाराव पाटील धनगर समाजाचे नेते नवनाथ पडळकर ,  प्रा किसन चव्हाण, प्रा, विष्णू जाधव डी. पी. आय. चे प्रदेशाध्याक्ष मा. अजिंक्य चांदणे, बारा बलुतेदार संघटनेचे मा. भीमराव दळे  युवा नेते शिवराज बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने राज्यात सर्व विधानसभेच्या जागेवर उमेदवार निवडणूक लढवत आहेत, बीडमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि चळवळीची संलग्न असलेले अशोक हिंगे यांना उमेदवारी मिळाली तर गेवराई मधून धनगर समाजाचे नेते विष्णू देवकते हे उमेदवार असून सर्व बीड जिल्ह्यातील  वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीड येथील  माने कॉम्प्लेक्स परिसरातील मैदानामध्ये, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे 13 ऑक्टोबर रोजी रविवारी सायंकाळी 05 वाजता आयोजन करण्यात आले आहे, या सभेला बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बंधु भगीनी यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे