अकोट न.पा. कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ईश्वरदास पवार सचिव धनंजय सुरे

0
572
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी-

महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना शाखा अकोट यांची अध्यक्षपदी ईश्वरदास पवार व सचिवपदी धनंजय सुरे यांची कर्मचाऱ्यांनी अविरोध निवड केली. संघटनेच्या मागील कार्यकारणी चा कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी गठित करण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर यांचे अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीची सभा बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष पदाकरिता ईश्वरदास पवार यांचे नाव धनंजय सुरे यांनी सुचवले व त्यास सुरेंद्र सोनोने यांनी अनुमोदन दिले तर सचिव पदासाठी धनंजय सुरे यांचे नाव राजेंद्र मनसुटे यांनी सुचवले व त्यास मोहन गुजर यांनी अनुमोदन दिले, या निवडीचे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले यानंतर अध्यक्ष ईश्वरदास पवार यांनी पुढील प्रमाणे कार्यकारणी जाहीर केली अध्यक्ष ईश्वरदास पवार, कार्याध्यक्ष विजय रताळे, उपाध्यक्ष संजय बेलुरकर, उपाध्यक्ष कु.मयुरी जोशी, सचिव धनंजय सुरे, उपसचिव ऋषिकेश तायडे, कोषाध्यक्ष मोहन गुजर, सदस्य राजेंद्र मनसुटे, इरफान अहमद खैर मोहम्मद, सत्यनारायण सावरकर, सुनील नाथे, श्रीकृष्ण केंद्रे, निजामुद्दीन रफीयोउद्दीन, श्रीमती रजनी गजबे, सुरेंद्र सोनोने, विनोद तेलगोटे शेख अल्ताफ शेख करामत, दत्तात्रय सोळंके
वरील कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर यांनी स्वागत करून मंजुरी दिली. सभेच्या शेवटी कर अधिक्षक कु. मयुरी जोशी यांनी सर्वांचे आभार मानले